Home महाराष्ट्र राष्ट्रवादीची कबर महाराष्ट्र खोदल्याशिवाय राहणार नाही; भाजप नेत्याचा इशारा

राष्ट्रवादीची कबर महाराष्ट्र खोदल्याशिवाय राहणार नाही; भाजप नेत्याचा इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आल्याची घटना घडली. यानंतर देशभरात तणावाचं वातावरण होतं. या घटनेचे देशभरातून निषेध करण्यात येत होता. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीका केली होती. याला आता भाजप आमदार राम सातपुते यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. बाजारू अमोल मिटकरी काँग्रेसचे तळवे चाटून झाले असेल तर सांगा त्यांना शिवरायांचा अपमान करणारा कांग्रेस चा कार्यकर्ता आहे. खर तर तुमची आणि तुमच्या राष्ट्रवादीची कबर महाराष्ट्र खोदल्याशिवाय राहणार नाही, असं राम सातपुते यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : ‘..तर घरा-दारासकट सगळं सोडून जातो’; भाजप आमदाराचं मोठं वक्तव्य

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कुणी काही बोललं किंवा त्यांचा अपमान केला तर भाजप शांत बसत नाही पण देशाचं दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यास महाराष्ट्रातील भाजपची बांडगुळं शांत बसत असतील तर त्यांची कबर खोदण्याची हीच वेळ आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले होते.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?”

2019 च्या निवडणुकीत जनतेनं तुम्हाला औकात दाखवून दिली आहे; धनंजय मुंडेचा पलटवार

गुलाबराव म्हणाले, मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे; आता हेमा मालिनी म्हणतात…