Home देश गुलाबराव म्हणाले, मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे; आता हेमा मालिनी म्हणतात…

गुलाबराव म्हणाले, मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे; आता हेमा मालिनी म्हणतात…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : जळगावमधील एका प्रचारसभेत बोलताना शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

हे ही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जर कोणता पक्ष पाठिशी घालत असेल तर …; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना डिवचताना रस्त्यांची तुलना भाजप खासदार व अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांशी केली होती. गुलाबरावांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय राजकीय वातावरण चांगलंच तापलं. यानंतर गुलाबराव पाटलांवर अनेकांनी टीका केली.

मी माझे गाल चांगले ठेवत असते म्हणून कदाचित बोलले असतील. हरकत नाही. हा विनोदाचा भाग सोडा. मला वाटतं त्यांना काही वाटलं असेल म्हणून बोलले. काही वर्षांपूर्वी लालूंनी असं विधान केलं होतं. त्यानंतर अनेकांनी तसंच बोलायला सुरुवात केली. पण अशा प्रकारची कमेंट करणं योग्य नाही. सामान्य लोकांनी बोलणं वेगळं. पण संसदीय राजकारणातील व्यक्तीने असं विधान करू नये., असं हेमा मालिनी म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

“खडसेंना 15 वर्षे लाल दिव्याची गाडी अन् 12 पदं मिळाली, पण विकासकामं करण्यात अपयश, आता दुकानदारी बंद करावी”

निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही; रोहित आर आर पाटलांचा विरोधकांवर घणाघात

अमित शहा म्हणाले, राजीनामा द्या आणि निवडणूकीला सामोरे जा; आता नाना पटोले म्हणतात…