Home जळगाव “खडसेंना 15 वर्षे लाल दिव्याची गाडी अन् 12 पदं मिळाली, पण विकासकामं...

“खडसेंना 15 वर्षे लाल दिव्याची गाडी अन् 12 पदं मिळाली, पण विकासकामं करण्यात अपयश, आता दुकानदारी बंद करावी”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : महाराष्ट्रात सध्या नगर पंचायत निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. अशातच आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही; रोहित आर आर पाटलांचा विरोधकांवर घणाघात

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीसाठी पळतो, अन् स्वतःच्या मतदारसंघाचा विकास मात्र भकास आणि म्हणे मोठा नेता, असं म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार हल्लाबोल केला. ते बोदवड येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत होते.

15 वर्ष लाल दिव्याची गाडी अन् 12 खाते मिळाले. आणि तरीही एकनाथ खडसे मतदारसंघाचा विकास करू शकले नाही. चुकीच्या वागणुकीमुळे लोकांनी तुम्हाला शिक्षा दिलीय. कमिशनसाठी लल्लु पंजु भांडतात आणि कसा विकास होईल. आता कितीही आवाज चढवला तुमची धार बोथट झाली आहे. आता तुमचं खरं नाही दुकानदारी बंद करा, असा टोला गिरीश महाजनांनी यावेळी एकनाथ खडसेंना लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

अमित शहा म्हणाले, राजीनामा द्या आणि निवडणूकीला सामोरे जा; आता नाना पटोले म्हणतात…

“मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार हे ठरलं होतं, पण ऐनवेळी शिवसेनेने हिंदूत्वाशी तडजोड केली”

“राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार हरवलंय,शोधून देणाऱ्यास पुरस्कार देऊ”