Home महाराष्ट्र निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही; रोहित आर आर पाटलांचा विरोधकांवर घणाघात

निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही; रोहित आर आर पाटलांचा विरोधकांवर घणाघात

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : राष्ट्रवादीचे नेते व चिरंजीव रोहित पाटील हे राजकारणात सक्रीय झाले आहेत. तसेच सध्या सांगली जिल्ह्यात नगरपंचायतीच्या निवडणूकीचं वारं वाहू लागलं आहे. कवठेमहांकाळ येथील प्रचार सभेत बोलताना रोहित पाटलांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

हे ही वाचा : अमित शहा म्हणाले, राजीनामा द्या आणि निवडणूकीला सामोरे जा; आता नाना पटोले म्हणतात…

निवडणुकीचा निकाल 19 तारखेला स्पष्ट होईल, त्यावेळी माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. आता ज्यांच्या हाती 15 वर्षे सत्ता होती, नगरपंचायत होती आज तेच लोक आदर्श नगरपंचायत घडवण्यासाठी एकत्र आलो आहे, असं म्हणत आहेत, असं रोहित पाटलांनी यावेळी म्हटलं.

मी कवठेमहांकाळचा संपूर्ण परिसर पिंजून काढला आहे. विस्तारित भाग आणि तिथली परिस्थिती काय आहे हे मला माहीत आहे. विकासाच्या मुद्द्यावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे, जे लोक मला सल्ले देण्याचे काम करत आहेत त्यांनी या शहरात काय विकास कामे प्रलंबित आहेत, हे माझ्या पुढे येऊन सांगावं, असंही रोहित पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार हे ठरलं होतं, पण ऐनवेळी शिवसेनेने हिंदूत्वाशी तडजोड केली”

“राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार हरवलंय,शोधून देणाऱ्यास पुरस्कार देऊ”

अमित शहांच्या मदतीसाठी अजित पवार धावून आले, यावर रूपाली पाटील यांची प्रतिक्रिया म्हणाल्या…