“बीडमधील LIC ऑफिसला भीषण आग; कागदपत्रं, साहित्य जळून खाक”

0
217

बीड : बीड येथील एलआयसी कार्यालयाला आज भीषण आग लागली. आगीच्या दुर्घटनेत कोट्यवधी रूपयांचे साहित्य आणि कागदपत्रे जळाले असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या आग आटोक्यात आली असली तरी संपूर्ण परिसरात धुरा लोट पसरले आहेत.

पहाटेची वेळ असल्यामुळे एलआयसी ऑफिसला लागलेली आग सर्वत्र लवकर पसरली. त्यामुळे ऑफिसचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचं समोर येत आहे. ऑफिसमधील जुने दस्तावेज, कॉम्प्युटर आणि महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले आहेत. आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आलं नाही आहे.

ही भीषण आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल्या झाल्या होत्या. अग्निशमन दलातील जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. ही भीषण आग अग्निशमन दलाने पूर्णपणे आग आटोक्यात आणली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मी अर्णब गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच, हिंमत असेल तर अडवून दाखवा- राम कदम

दिल्ली कॅपिटल्स फायनलमध्ये! कगिसो रबाडा- मार्कस स्टाॅयनिसची घातक गोलंदाजी; हैदराबादचा 17 धावांनी पराभव

जो बायडन म्हणजे गजनी, वर्षभरही सत्तेत राहणार नाहीत- कंगणा रणाैत

मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही, पण फटाक्यांच्या धुराने कोरोना वाढू शकतो, आतापर्यंतची मेहनत वाया जाईल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here