Home क्रीडा दिल्ली कॅपिटल्स फायनलमध्ये! कगिसो रबाडा- मार्कस स्टाॅयनिसची घातक गोलंदाजी; हैदराबादचा 17 धावांनी...

दिल्ली कॅपिटल्स फायनलमध्ये! कगिसो रबाडा- मार्कस स्टाॅयनिसची घातक गोलंदाजी; हैदराबादचा 17 धावांनी पराभव

दुबई : आजच्या आयपीएल Qualifier-2 च्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा 17 धावांनी पराभव केला.

दिल्ली कॅपिट्सने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी गमावत 189 धावा केल्या. दिल्लीकडून शिखर धवनने 50 चेंडूत 78 धावांची खेळी केली. तर शिमरन हेटमायरने 22 चेंडूत 42 धावा, मार्कस स्टाॅयनिसने 27 चेंडूत 38 धावा केल्या. तर हैदराबादकडून संदीप शर्मा, जेसन होल्डर व राशिद खानने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना हैदराबादने 20 षटकात 8 गडी गमावत 172 धावा केल्या. हैदराबादकडून केन विलियम्सनने 45 चेंडूत 67 धावा, अब्दुल समादने 16 चेंडूत 66 धावा, तर मनीष पांडेने 14 चेंडूत 21 धावा केल्या. दिल्लीकडून कगिसो रबाडाने4, मार्कस स्टाॅयनिसने 3, तर अक्षर पटेलने 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

जो बायडन म्हणजे गजनी, वर्षभरही सत्तेत राहणार नाहीत- कंगणा रणाैत

मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही, पण फटाक्यांच्या धुराने कोरोना वाढू शकतो, आतापर्यंतची मेहनत वाया जाईल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Qualifier-2 : शिखर धवन-शिमरन हेटमायरची फटकेबाजी; दिल्लीचे हैदराबादसमोर 190 धावांचे लक्ष्य

फालतूगिरी बंद करा आणि….; निलेश राणेंची रोहित पवारांवर टीका