पुणे : कायद्यानुसार महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यास बंदी आहे. मात्र बैलगाडा मालकांनी शर्यत सुरू करण्यासाठी आंदोलने केली आहेत. यातच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत. यासाठी अमोल कोल्हेंनी बैठक बोलावली होती. त्यावेळी ते बोलत होते.
बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी वाट्टेल ती राजकीय किंमत मोजायला तयार आहे., असं अमोल कोल्हे यांनी यावेळी म्हटलं. तसेच यावेळी महाराष्ट्रात असा वणवा पेटवू की त्याची धग दिल्लीत पोहोचली पाहिजे, असा घणाघात अमोल कोल्हेंनी यावेळी केला.
दरम्यान, काहीही झालं तरी चालेल पण जनतेला दिलेल्या शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन हे विघ्नहर्ता गणरायांच्या साक्षीने सांगतो, असंही अमोल कोल्हे यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
बैलगाडी शर्यतीसाठी गोपीचंद पडळकरांनी फुंकलं रणशिंग; 20 ऑगस्टला सांगलीत आयोजन
नाना पटोलेंच्या कार्यक्रमाला मंत्री नितीन राऊतांची दांडी; चर्चेला उधाण!
युवासेनेच्या कार्यक्रमात गर्दी; आयोजकांवर गुन्हा दाखल
पंतप्रधान मोदींना हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये वाद निर्माण करायचा आहे का?; नाना पटोलेंचा सवाल