Home महाराष्ट्र युवासेनेच्या कार्यक्रमात गर्दी; आयोजकांवर गुन्हा दाखल

युवासेनेच्या कार्यक्रमात गर्दी; आयोजकांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद : औरंगाबाद येथे युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी बघायला मिळाली, त्यामुळे कोरोना नियमांना हरताळ फासल्याचे दिसून आलं होतं.

गर्दी जमवून कोरोना प्रतिंबधक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी युवासेनेच्या संवाद मेळाव्याचे आयोजक शिवसेना नेते राजेंद्र जंजाळ आणि पदाधिकाऱ्यांवर जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार सचिव वरुण सरदेसाई युवा संवादाच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधत आहेत.

औरंगाबादेतही 13 ऑगस्ट रोजी अशाच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात युवासेनेचे पदाधिकारी तसेच इतर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. याच कारणामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादेतील संवाद मेळावा राजेंद्र जंजाळ यांनी आयोजित केला होता.

महत्वाच्या घडामोडी –

पंतप्रधान मोदींना हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये वाद निर्माण करायचा आहे का?; नाना पटोलेंचा सवाल

बीडमधील वाढत्या गुंडगिरीवरुन पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात; म्हणाल्या…

राज्यातील महाविद्यालये लवकरच सुरू होणार; शिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा

“शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांची ‘या’ कारणासाठी होणार चाैकशी”