Home महाराष्ट्र पंतप्रधान मोदींना हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये वाद निर्माण करायचा आहे का?; नाना पटोलेंचा सवाल

पंतप्रधान मोदींना हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये वाद निर्माण करायचा आहे का?; नाना पटोलेंचा सवाल

मुंबई : भारताला स्वातंत्र्य होऊन उद्या 75 वर्ष पुर्ण होत आहेत. देशभरात सर्वत्र स्वातंत्र्यदिनाची जोरदार तयारी चालू आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. 14 ऑगस्ट हा दिवस आता ‘फाळणी वेदना स्मृतिदिन’, म्हणून ओळखला जाणार, अशी घोषणा नरेंद्र मोदींनी केली आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय .

देशात 14 ऑगस्ट 1946 मध्ये रक्तपात घडला, हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण केले गेले. पंतप्रधान मोदींनी आता पुन्हा त्याची स्मृती म्हणून हा 14 ऑगस्ट स्मृती दिवस साजरा करण्याचा निर्णय केला., असं नाना पटोलेंनी यावेळी म्हटलं.

स्मृतीचा अर्थ काय असतो? त्याचा अर्थ म्हणजे पुन्हा आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत चालण्याचा प्रयत्न करायचा, असा होतो. नरेंद्र मोदींना तो रक्तपाताचा दिवस स्मृती दिवस म्हणून साजरा का करायचा आहे? पुन्हा या देशात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करायचा आहे का?, असा हल्लाबोल नाना पटोलेंनी यावेळी केली.

दरम्यान, म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतोय की, ही लढाई सोपी नाही. हिंदू – मुस्लिम हे एक आहेत. पण त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न सातत्याने भाजपाची मानसिकता असलेले लोकं हे सातत्याने या देशाला तोडण्याचं, विभाजित करण्याचं, या देशाचं संविधान संपवण्याचं पाप करत असतील तर अशावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आगे बढो आगे बढो नाही… युवकांची ताकद आता या देशद्रोहींच्या विरोधात उभी करण्याचं काम आपण केलं पाहिजे, असंही नाना पटोलेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

बीडमधील वाढत्या गुंडगिरीवरुन पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात; म्हणाल्या…

राज्यातील महाविद्यालये लवकरच सुरू होणार; शिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा

“शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांची ‘या’ कारणासाठी होणार चाैकशी”

ओबीसींच्या हक्कासाठी कौटुंबिक संबंध बाजूला ठेवून लढायलाही तयार; पंकजा मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा