Home महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीसाठी गोपीचंद पडळकरांनी फुंकलं रणशिंग; 20 ऑगस्टला सांगलीत आयोजन

बैलगाडी शर्यतीसाठी गोपीचंद पडळकरांनी फुंकलं रणशिंग; 20 ऑगस्टला सांगलीत आयोजन

सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यतीसाठी रणशिंग फुंकलंय. येत्या 20 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात पडळकर यांनी मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे.

कायद्यानुसार महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यास बंदी आहे. ही बंदी उठवण्याची मागणी राज्यातील काही संघटना तसेच पक्षांनी केली आहे. या मुद्द्याला घेऊन अनेक ठिकाणी आंदोलनेदेखील करण्यात आली  आहेत. या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यतीसाठी पडळकरसुद्धा मैदानात उतरले आहेत.

दरम्यान, या बैलगाडा शर्यतीसाठी पडळकर यांनी लाखो रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे.शर्यतीत प्रथम येणाऱ्यास त्यांनी 1 लाख 11 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. द्वितीय तसेच तृतीय आणि चौथा क्रमांक पटकावणाऱ्यांनाही वेगवेगळे बक्षीस देण्यात येणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

नाना पटोलेंच्या कार्यक्रमाला मंत्री नितीन राऊतांची दांडी; चर्चेला उधाण!

युवासेनेच्या कार्यक्रमात गर्दी; आयोजकांवर गुन्हा दाखल

पंतप्रधान मोदींना हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये वाद निर्माण करायचा आहे का?; नाना पटोलेंचा सवाल

बीडमधील वाढत्या गुंडगिरीवरुन पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात; म्हणाल्या…