“किरीट सोमय्या आक्रमक?; रश्मी ठाकरेंविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल, ठाकरेंच्या अडचणीत वाढ”

0
250

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आता पुन्हा एकदा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

सोमय्या यांनी अलिबागमधील रेवदंडा पोलीस ठाण्यात रश्मी ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अलिबागमधील कथित बंगल्यांप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे ही वाचा : अपघात नेमका कसा झाला?; ऋषभ पंतने सांगितलं नेमकं कारण, म्हणाला, ओव्हरस्पिडमुळे नव्हे तर…

रश्मी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात जमिनीचे व्यवहार झाले आहेत. रश्मी ठाकरे यांच्या नावावर कोकणात 19 बंगले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा गैरवापर करत रश्मी ठाकरे यांचे नाव त्या व्यवहारातून कमी केले, असा दावा सोमय्यांनी यावेळी केला.

दरम्यान, रश्मी ठाकरे यांच्या जमीन व्यवहाराची कागदपत्रे गहाळ करण्यात आली आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी या जमीन व्यवहाराचे कागदपत्रे गहाळ करायला लावले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे, अशी मागणीही सोमय्यांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या घडामोडी –

मलाही तुरूंगात टाकण्यासाठी प्लॅन आखला; विधानपरिषदेत देवेंद्र फडणवीसांचा गाैफ्यस्फोट

“केंद्रीय मंत्री नारायण राणे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल, भाजप-मनसे युतीच्या चर्चांना जोर”

“ब्रेकींग न्यूज! क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात, पंतला रूग्णालयात केलं दाखल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here