Home देश अपघात नेमका कसा झाला?; ऋषभ पंतने सांगितलं नेमकं कारण, म्हणाला, ओव्हरस्पिडमुळे नव्हे...

अपघात नेमका कसा झाला?; ऋषभ पंतने सांगितलं नेमकं कारण, म्हणाला, ओव्हरस्पिडमुळे नव्हे तर…

276

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमचा विकेटकीपर खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पंत जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर सीसीटीव्ही फूटेज समोर आले असून त्यात गाडीचा वेग जास्त असल्याचं म्हटलं जात आहे. तर काहींनी ऋषभ पंतला डुलकी लागल्यामुळे अपघात झाला असावा असं म्हटलं आहे. मात्र आता पंतनेच स्वत: अपघाताच्या कारणाबद्दल खुलासा केला आहे.

हे ही वाचा : “केंद्रीय मंत्री नारायण राणे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल, भाजप-मनसे युतीच्या चर्चांना जोर”

रुरकी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर सध्या पंत देहरादूनच्या मॅक्स रुग्णालयात उपचार घेत आहे. याठिकाणी त्याला भेटण्यासाठी दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन ची टीम पोहोचली आहे. यावेळी डीडीसीएचे संचालक शायम शर्मा यांच्याशी बोलत असताना ऋषभ पंतने अपघाताबाबत नवा खुलासा केला आहे.

गाडी चालवत असताना रस्त्यात एक खड्डा आला. तो खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला., असं पंत म्हणाला. श्याम शर्मा यांनी ऋषभ पंतला अपघाताचे कारण विचारले होते. यावेळी त्यांना उत्तर देत असताना पंत म्हणाला की, रात्रीची वेळ होती. समोर खड्ड्यासारखं मला काहीतरी दिसलं. म्हणून खड्डा वाचविण्याचा प्रयत्न मी केला. त्यामध्ये हा अपघात झाला.

महत्त्वाच्या घडामोडी –

मलाही तुरूंगात टाकण्यासाठी प्लॅन आखला; विधानपरिषदेत देवेंद्र फडणवीसांचा गाैफ्यस्फोट

मलाही तुरूंगात टाकण्यासाठी प्लॅन आखला; विधानपरिषदेत देवेंद्र फडणवीसांचा गाैफ्यस्फोट

“ब्रेकींग न्यूज! क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात, पंतला रूग्णालयात केलं दाखल”