जयंत पाटील आले, मात्र एकाही शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत; पंकजा मुंडेंची टीका

0
296

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच मराठवाड्यातील सर्वच धरणं तुडूंब भरले असून अनेक नद्यांनी पात्र सोडल्यानं नद्यांचं पाणी शेतात शिरलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे सध्या बीड दाैऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी परळी तालुक्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी पंकजा मुंडेंनी केली. तसेच यावेळी बोलताना पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

आमच्या सरकारच्या काळात मोबाईल वाजला तरी शेतकऱ्यांना वाटायचं की मदत आली. आताच्या सरकारमध्ये कसलीही मदत नाही. पाटील यांनी बीडचा दौरा केला पण, त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही, असा घणाघात पंकजा मुंडेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेना नेत्यांवरील ईडीच्या कारवायांमागे राजकारण नाही- सुधीर मुनगंटीवार

पोटनिवडणुकीने निघाला भाजपा-मनसे युतीचा मुहूर्तच; आणखी ‘या’ 4 ठिकाणी युती होणार!

ईडीची नोटीस अनिल परबांना अन् छातीत धडकी उद्धव ठाकरेंच्या; नितेश राणेंचा टोला

जावयाचं नाव सातत्याने घेऊ नका; हसन मुश्रीफांचा किरीट सोमय्यांना इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here