संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर, जयंत पाटलांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, समाजात दुही माजवणाऱ्या…

0
401

मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी काल बोलताना, पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं.

महात्मा गांधींचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं सांगितलं जातं. परंतु, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील होते, असं वादग्रस्त विधान संभाजी भिडेंनी केलं. संभाजी भिडेंच्या या वक्तव्यावरून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह असे वक्तव्य केले आहे. भिडे यांनी यापूर्वी देखील अनेक अनैतिहासिक आणि अवैज्ञानिक विधाने करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केला आहे. अशाप्रकारे समाजात दुही माजवणाऱ्या विधानांचा मी वेळोवेळी निषेध करत आलो आहे., असं जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे या देशाच्या निर्मितीमधील योगदान अमूल्य असे आहे. केवळ भारतच नाही तर जगभर गांधींच्या विचारांना आदर व सन्मान आहे. मनोहर भिडे यांच्यावर सरकारने त्वरित गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी., अशी संतप्त प्रतिक्रिया जयंत पाटलांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या घडामोडी –

शरद पवारांसोबतच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?; नाना पटोलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

‘इर्शाळवाडी ग्रामस्थांनी आठ वर्षांपूर्वीच…’; मनसेचं ट्वीट चर्चेत

“100 कोटींची माती, मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पुन्हा दरड कोसळली, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here