Home महाराष्ट्र संभाजी भिडेंना अटक करा, काँग्रेसच्या मागणीवर आता भाजपची प्रतिक्रिया, म्हणाले…

संभाजी भिडेंना अटक करा, काँग्रेसच्या मागणीवर आता भाजपची प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी आज बोलताना, पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं.

महात्मा गांधींचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं सांगितलं जातं. परंतु, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील होते, असं वादग्रस्त विधान संभाजी भिडेंनी केलं. संभाजी भिडेंच्या या वक्तव्यावरून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांसोबतच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?; नाना पटोलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

भिडेंच्या वक्तव्याचे आज विधानसभेत पडसाद उमटलेले पहायला मिळाले. यावेळी विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संभाजी भिडे हे भाजपाचं पिल्लू असल्याचं म्हटलं आहे. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजी भिंडे यांचं जे काही वादग्रस्त वक्तव्य असेल ते सरकार तपासून बघेल. संभाजी भिडेंचा आणि आमचा संबंध नाही. संभाजी भिडे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते आमच्या पक्षाचे कार्यकर्ते थोडी आहेत. त्यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं असेल तर ते सरकार तपासेल. त्यावर सरकारला वाटेल तो निर्णय घेतला जाईल., असं बावनकुळे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

‘इर्शाळवाडी ग्रामस्थांनी आठ वर्षांपूर्वीच…’; मनसेचं ट्वीट चर्चेत

“100 कोटींची माती, मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पुन्हा दरड कोसळली, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत”

“राज ठाकरेंना टाळी देणार का?; उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले, प्रस्ताव आला तर…”