Home बीड “मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन…”; अब्दुल सत्तार यांचं मोठं वक्तव्य

“मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन…”; अब्दुल सत्तार यांचं मोठं वक्तव्य

503

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यानंतर महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल, असं मत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलं. ते रविवारी रात्री बीडमध्ये बोलत होते.

हे ही वाचा : कोल्हापूरातील हेरवाड गावाने घेतला देशाला दिशा दाखवणारा ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय; रूपाली चाकणकरांकडून काैतुक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे जे बोलले ते ते त्यांनी केलं. त्यांचं लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देशात नाव आहे. काही लोकांना बोलण्यासाठी माईक पाहिजे, काही तरी विषय पाहिजे. म्हणून ते अशा विषयांवर बोलतात. मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

आम्हीच आता शिवसेनेचा कोथळा बाहेर काढू; रावसाहेब दानवेंचा जोरदार हल्लाबोल

गोपीनाथ मुंडे आज महाराष्ट्रात असते तर…; एकनाथ खडसेंनी काढली गोपीनाथ मुंडेंची आठवण

“…या कारणासाठी सांगलीत शिवसेना-राष्ट्रवादीचा वाद चव्हाट्यावर”