Home महाराष्ट्र कोल्हापूरातील हेरवाड गावाने घेतला देशाला दिशा दाखवणारा ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय; रूपाली चाकणकरांकडून...

कोल्हापूरातील हेरवाड गावाने घेतला देशाला दिशा दाखवणारा ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय; रूपाली चाकणकरांकडून काैतुक

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतिशील वारसा सांगणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड (ता.शिरोळ) गावाने एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. गावातील विधवांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी विधवा प्रथा बंद करण्याचा महत्वपूर्ण ठराव ग्रामसभेने पारित केला आहे.

पतीच्या निधनानंतर स्त्रीच कुंकू पुसले जाते, तिच्या हातातील बांगड्या फोडल्या जातात, मंगळसूत्र तोडले जाते आणि जोडवी काढली जातात. ही प्रथा आता हेडवाडमध्ये बंद करण्यात आली आहे. हेरवाड गावच्या ग्रामसभेने विधवा प्रथा बंदीचा महत्तवपूर्ण निर्णय घेतला आहे. गावचे सरपंच सुरगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा ठराव पारित करण्यात आला आहे.

हे ही वाचा : आम्हीच आता शिवसेनेचा कोथळा बाहेर काढू; रावसाहेब दानवेंचा जोरदार हल्लाबोल

दरम्यान, या निर्णयावरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ट्विट करत या निर्णयाचं काैतुक केलं आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतिशील वारसा सांगणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीनं घेतलेल्या ‘विधवा प्रथा बंद’ या निर्णयाचं मी स्वागत करते, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

गोपीनाथ मुंडे आज महाराष्ट्रात असते तर…; एकनाथ खडसेंनी काढली गोपीनाथ मुंडेंची आठवण

“…या कारणासाठी सांगलीत शिवसेना-राष्ट्रवादीचा वाद चव्हाट्यावर”

उद्धव ठाकरेंना आवाहन देणाऱ्या खासदार नवनीत राणांना, गुलाबराव पाटलांचं जोरदार उत्तर, म्हणाले…