Home देश मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन; ‘या’ भाजपच्या माजी आमदाराचं...

मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन; ‘या’ भाजपच्या माजी आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

कोलकाता :  मला कोरोनाची लागण झाली तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन, असं वक्तव्य भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय सचिव आणि माजी आमदार अनुपम हाजरा यांनी केलं आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील बरईपूर येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

जर मला कोरोनाची लागण झाली तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन. कारण या संकटात त्यांनी कोरोनाबाधितांना खूप चुकीची वागणूक दिली आहे. कोरोनाबाधित मृतदेहांवर रॉकेल टाकून जाळलं आहे. अशा प्रकारची वर्तवणूक आपण कुत्रे आणि मांजरींसोबतदेखील करत नाही, असं अनुपम हाजरा यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, आमचे कार्यकर्ते कोरोनापेक्षा जास्त मोठ्या संकटांशी लढत आहेत. ते ममता बॅनर्जी यांच्याविरोधात लढत आहेत. ते कोरोनामुळे प्रभावित झालेले नाहीत. त्यांना कुणाचीही भीती वाटत नाही, असंही अनुपम हाजरा यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राहूल टेवाटिया व संजू सॅमसन यांची दमदार अर्धशतके; राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबवर धमाकेदार विजय

“ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हिली हिनं मोडला महेंद्रसिंग धोनीचा विक्रम”

मयंक अगरवालचे शानदार शतक; पंजाब चांगल्या स्थितीत

के.एल.राहूल आणि मयंक अगरवालची नाबाद शतकी भागीदारी; किंग्स इलेव्हनची जोरदार सुरूवात