Home नागपूर मी राष्ट्रवादी नाही तर ‘या’ पक्षात जाण्यास इच्छुक- एकनाथ खडसे

मी राष्ट्रवादी नाही तर ‘या’ पक्षात जाण्यास इच्छुक- एकनाथ खडसे

नागपूर : भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. यावर एकनाथ खडसे यांनी मी राष्ट्रवादीत नाही तर रामदास आठवलेंच्या ‘रिपाइं’मध्ये जाण्यास इच्छुक आहे, असं म्हणत या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

“मी राष्ट्रवादी नाही तर रामदास आठवलेंच्या (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) रिपाइं या पक्षात जाण्यास इच्छुक आहे. यासाठी मी रामदास आठवले यांच्याकडून परवानगी घेणार आहे”, असं उत्तर खडसेंनी पत्रकारांना दिलं आहे.

एकनाथ खडसे आज नागपूर येथे शरद पवारांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली होती. यावर पत्रकारांनी खडसेंना विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर देत मी आठवलेंच्या पक्षात जाणार असल्याचे म्हटलं आहे.

दरम्यान, खडसेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

-माझी जात वंजारी आहे आणि हा कायदा माझ्या जातीविरुद्ध- जितेंद्र आव्हाड

-आपण भारताचे नागरिक आहोत हे सिद्ध कारायला प्रोब्लेम काय?- शशांक केतकर

-रोहित शेट्टीमुळे अभिनेत्री नीना गुप्ता यांना सोडावा लागला ‘हा’ चित्रपट

-शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार