Home देश मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज पंकजाताई आहेत-...

मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज पंकजाताई आहेत- डाॅ.भागवत कराड

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार काही दिवसांपूर्वी झाला. यामध्ये डाॅ. भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आलं. मात्र प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा सुरू होती.

3 दिवसांपूर्वी पंकजा मुंडे अचानक दिल्ली दाैऱ्यावर गेल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. तसेच त्यासोबत त्यांनी डाॅ. भागवत कराड यांची देखील भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावर स्वत: डाॅ.भागवत कराड यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

आज पंकजा मुंडे ताई दिल्ली मध्ये बैठकीसाठी आल्या त्यांची भेट घेतली…मन मोकळे झाले..मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली..मी मंत्री झालो मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत..त्यांनीही साहेबांच्या प्रमाणे शुभेच्छा दिल्या.., असं डाॅ.भागवत कराड यांनी ट्विट करत सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

मी सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर करत आहे; पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

“नितेश राणेंकडे असलेली प्रगल्भता दुर्देवानं शिवसेनेकडे नाही”

“संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा”

नाना पटोलेंची भूमिका मविआला सुरूंग लावणारी- अजित पवार