जळगाव : मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला आहे. अशी माहिची एकनाथ खडसेंनी दिली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माहिती दिली आहे.
काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, पण मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांना गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला, असं एकनाथ खडसे म्हणाले.
गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकरांसारखे कितीतरी नेते होते, त्यांच्यासोबत आजतागातयत भाजपचं काम केलं. भाजपने मला अनेक मोठी पदं दिली, मी ती नाकारु शकत नाही. मी भाजपवर किंवा केंद्रातील नेत्यावर टीका केली नाही, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी करणार प्रवेश; जयंत पाटील यांनी केली अधिकृत घोषणा
राज्य सरकारने बोलघेवडेपणा सोडावा, कृती करुन दाखवावी- देवेंद्र फडणवीस