Home नांदेड राज्य सरकारने बोलघेवडेपणा सोडावा, कृती करुन दाखवावी- देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारने बोलघेवडेपणा सोडावा, कृती करुन दाखवावी- देवेंद्र फडणवीस

हिंगोली : राज्य सरकारमध्ये केवळ बोलणारे नेते आहेत. हे नेते रोज प्रसारमाध्यमांच्या माईकसमोर येऊन बोलतात. पण प्रत्यक्षात निर्णय कोण घेणार? त्यामुळे आता सरकारने बोलघेवडेपणा सोडून प्रत्यक्ष कृती करुन दाखवावी, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तरी सरकारने आता जागे झाले पाहिजे. सध्याच्या सरकारमध्ये केवळ बोलणारे नेते आहेत. हे सर्व जण मीडियात येऊन माईकसमोर बोलतात. मग प्रत्यक्ष निर्णय कोण घेणार? सरकारला शेतकऱ्यांच्या परिस्थितीविषयी बिलकूल गांभीर्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सरकारमधील नेत्यांकडून केवळ टिंगलटवाळी, डायलॉगबाजी आणि वेळकाढूपणा सुरु आहे. हे सर्व थांबवून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घेतला पाहिजे आणि तात्काळ कारवाई केली पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मोदींवर टीका करणारं ‘ते’ रिट्विट एकनाथ खडसेंकडून डिलीट

मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे फडणवीसांनी स्पष्ट करावं- जयंत पाटील

निकोलस पूरन-ग्लेन मैक्सवेलची शानदार फलंदाजी; पंजाबची दिल्लीवर 5 विकेट्सनी मात

दुर्गा अष्टमीपर्यंत ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवा, अन्यथा आंदोलन अटळ; पंकजा मुंडेंचा सरकारला इशारा