“मै बाळासाहेब ठाकरेंका शिवसैनिक हूँ, मी कुणाला घाबरत नाही”

0
333

मुंबई : शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’ची नोटीस आली आहे. यानंतर संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

मै नंगा आदमी हूँ, बाळासाहेब ठाकरेंका शिवसैनिक हूँ… मी कुणाला घाबरत नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे.

तसेच गेल्या दीड महिन्यांपासून सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) आमच्याकडून माहिती, कागदपत्रं मागितली आहे. आम्ही त्यांना आवश्यक माहिती देत आहोत., असंही राऊत म्हणाले.

दरम्यान, ईडीनं अद्याप तरी त्यांच्या नोटिशीत पीएमसी बँक घोटाळ्याचा उल्लेख केलेला नाही. मग भारतीय जनता पक्षाच्या माकडांना ही माहिती कुठून मिळाली, ते कालपासून उड्या कसे काय मारू लागले? असा टोलाही यावेळी राऊतांनी लगावला.

महत्वाच्या घडामोडी-

“मै बाळासाहेब ठाकरेंका शिवसैनिक हूँ, मी कुणाला घाबरत नाही”

“राऊतसाहेब बोलले म्हणजे तथ्य असणार”

“नामर्दांना शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल”

…तर हे माझे शेवटचे आंदोलन असेल; अण्णा हजारेंचा केंद्र सरकारला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here