“राऊतसाहेब बोलले म्हणजे तथ्य असणार”

0
452

मुंबई : शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’ची नोटीस आली आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.

वर्षभरापासून सरकार पाडण्यासाठी ईडी आणि वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणला जात आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावर जयंत पाटील यांनी, राऊतसाहेब बोलले म्हणजे तथ्य असणार. ते खरं आहे, असं उत्तर दिलं.

दरम्यान, दिल्लीतल्या सरकारच्या विरोधात जे, जे बोलत आहेत, त्यांना ईडीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय असं वाटतं. घटनाक्रम बघितला तर ते लक्षात येईल. यातून काहीही निष्पन्न होणार नाही. एखाद्याला बदनाम करणं, त्रस्त करुन सोडणं हा प्रयत्न काही जण करतायत. हे देशातल्या जनतेला कळलं आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“नामर्दांना शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल”

…तर हे माझे शेवटचे आंदोलन असेल; अण्णा हजारेंचा केंद्र सरकारला इशारा

“ईडीची कारवाई राजकीय हेतूने, आम्ही कुणालाही घाबरत नाही”

“मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी सर्वात आधी माझ्या पक्षाने केली”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here