आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल सकाळी मुंबईतील शिवाजी पार्क येथे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर तातडीने त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तसेच काही वेळाने लगेजच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
या सगळ्या प्रकरणी संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सविस्तरपणे माहिती दिली.
हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांचा काँग्रस, राष्ट्रवादीला मोठा धक्का; तब्बल 41 जणांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
काल सकाळी मी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी निघालो होतो. सकाळी शिवाजी पार्कच्या गेट नंबर-5 जवळ असताना माझ्यावर एका व्यक्तीने, स्टंपने हल्ला केला. मी मागे वळून बघताच तो माझ्या डोक्यावर स्टंपने हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. मी लगेच माझ्या उजव्या हाताने स्टंप पकडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात दुसऱ्या एका व्यक्तीने स्टंपने माझ्या पायावर हल्ला केला. त्यानंतर मी खाली कोसळलो. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित लोक माझ्या दिशेने धावून आल्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला, अशी माहिती देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
“रूग्णवाहिका मध्येच बंद पडल्याने, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचं निधन”
“मीच जनतेच्या मनातील आमदार म्हणणाऱ्या, बंडखोर उमेद्वार राहुल कलाटे यांचं डिपाॅझिट रद्द”
“चिंचवडमध्ये पराभव, मात्र नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा डंका, 7 जागांवर मारली बाजी”