Home महाराष्ट्र पंकजा मुंडे यांच्या सोबतचे नाते कसे?; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

पंकजा मुंडे यांच्या सोबतचे नाते कसे?; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबई : राज्यातील नेतृत्वावर भाजप नेत्या पंकजा नाराज असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवरविधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबतच्या नात्याची उकल केली आहे.

आमचं नातं बहीण-भावाचं असून अजूनही हे नातं टिकून असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस बोलत होते.

मी गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत घडलो. मुंडे कुटुंबाशी माझं भावनिक नातं आहे. आजही ते नातं कायम आहे. त्यात तसूभरही फरक पडलेला नाही. हे नातं राजकारणापलिकडचं आहे. त्यात काहीच कमी अधिक होत नाही. आम्ही पूर्वी बहीण-भावाप्रमाणे महाराष्ट्रात फिरायचो. आजही आमचं हे नातं कायम आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, पंकजा मुंडे आणि फडणवीस यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळेही फडणवीसांचं हे विधान अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“तुमच्यासारखे सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत”

“आमच्या पंतप्रधानांनी 700 कोटी रूपये पाठवले तरी, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन काय दिवे लावले?”

राज कुंद्रा घरात घुसून KISS करू लागला आणि…; माॅडेल शर्लिन चोप्रानं केला धक्कादायक खुलासा

“अजितदादांनी भाषेबद्दल बोलणं म्हणजे, राज कुंद्रांनी कुठला पिक्चर बघावा हे सांगण्यासारखं”