Home महाराष्ट्र “आमच्या पंतप्रधानांनी 700 कोटी रूपये पाठवले तरी, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन काय दिवे...

“आमच्या पंतप्रधानांनी 700 कोटी रूपये पाठवले तरी, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन काय दिवे लावले?”

सिंधुदुर्ग : राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. मात्र केंद्र सरकारकडून 2020 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी 701 कोटी रुपये महाराष्ट्राला देण्यात आले आहेत. मात्र, सध्यस्थितीतील महापुरामुळे झालेल्या नुकसानाबाबत अद्याप पॅकेज जाहीर करण्यात आलेलं नाही. यावरून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘पंतप्रधान मोदी यांनी राणे साहेबांना पाहणी करण्याची परवानगी दिली आणि त्या पद्धतीने राणे साहेब आले. आणि राणे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी जी माहिती दिली त्या आधारे तातडीची 700 कोटींची मदत पाठवली आहे. आमच्या पंतप्रधानांनी 700 कोटी रुपये पाठवले तरी तुमच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन काय दिवे लावले हे वडेट्टीवारांनी सांगाव., असं जोरदार प्रत्युत्तर नितेश राणेंनी यावेळी दिलं.

दरम्यान, स्वतःचं ठेवायचं झाकून आणी दुसऱ्याचं पहायचं वाकून हे वडेट्टीवारांनी सोडून द्यावं’, असा घणाघात नितेश राणेंनी वडेट्टीवार यांच्यावर केला.

महत्वाच्या घडामोडी –

राज कुंद्रा घरात घुसून KISS करू लागला आणि…; माॅडेल शर्लिन चोप्रानं केला धक्कादायक खुलासा

“अजितदादांनी भाषेबद्दल बोलणं म्हणजे, राज कुंद्रांनी कुठला पिक्चर बघावा हे सांगण्यासारखं”

शिववडा, शिवथाळीच्या अद्भूत यशानंतर आता शिव भिंत; अतुल भातखळकरांचा टोला

“सांगलीकरांच्या चिंतेत वाढ! कृष्णेची पाणी पातळी वाढणार, पुढच्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज”