Home महाराष्ट्र “धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांचं छत्रपती संभाजीराजेंना पत्र”

“धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांचं छत्रपती संभाजीराजेंना पत्र”

मुंबई : मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असताना धनगर समाज देखील पुन्हा आरक्षणची मागणी करू लागला आहे. धनगर समाजाच्या आरक्षण मागणीला पाठिंबा देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांना विनंती पत्र पाठवलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून आपण धनगर समाजाच्या ST आरक्षण अंमलबजावणीस पाठिंबा द्यावा ही विनंती गोपीचंद पडळकर यांनी या पत्रात केली आहे.

दरम्यान, इतकंच नव्हे तर पाठिंबा दिल्यास समाजाच्या लढ्याला 12 हत्तींचं बळ येईल असंही पडळकरांनी या पत्रात म्हटलं आहे. तसेच आरक्षणाच्या अभ्यासाचा आणि रोखठोक भूमिकेचा धनगर आरक्षणासाठी उपयोग व्हावा, असंही पडळकर यांनी म्हटलं आहे.

https://www.facebook.com/GopichandMLC/posts/1811631152323933

महत्वाच्या घडामोडी-

“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पत्नी मेलानिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण”

“मुंबई इंडियन्सचा किंग्स इलेव्हन पंजाबवर धमाकेदार विजय”

“हाथरसमधली घटना पाशवी; महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का?”

“रोहित शर्माचे शानदार अर्धशतक; मुंबईचे पंजाबसमोर 192 धावांचे लक्ष्य”