Home क्रीडा “मुंबई इंडियन्सचा किंग्स इलेव्हन पंजाबवर धमाकेदार विजय”

“मुंबई इंडियन्सचा किंग्स इलेव्हन पंजाबवर धमाकेदार विजय”

दुबई : आयपीएलच्या आजच्या मुंबई इंडियन्स विरूद्ध किंग्स इलेव्हन पंजाब सामन्यात मुंबई इंडियन्सने किंग्स इलेव्हन पंजाबचा 48 धावांनी पराभव केला.

पंजाबने टॉस जिंकत मुंबई इंडियन्सला बॅटिंग करण्यास भाग पाडले. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट गमावत 191 धावा केल्या. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने 45 चेंडूत 70 धावा केल्या. तर शेवटच्या षटकांमध्ये किराॅन पोलार्डने 20 चेंडूत 47 धावा, हार्दिक पांड्याने 11 चेंडूत 30 धावा केल्या. किंग्स इलेव्हनकडून शेल्डन काॅट्रेल, मोहम्मद शमी व कृष्णाप्पा गाैतमने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना पंजाबचे सलामीवीर के.एल.राहूल व मयंक अगरवालने धमाकेदार सलामी दिली. दोघांनी 4.5 षटकात 38 धावांचा सलामी दिली. मात्र बुमराहच्या आत येणाऱ्या चेंडूवर मयंक आऊट झाला. मयंकने 18 चेंडूत 25 धावा केल्या. मयंकनंतर आलेला करूण नायरही शून्यावर आऊट झाला. जम बसलेला राहूलही आऊट झाला. राहूलने 19 चेंडूत 17 धावा केल्या. राहूल आऊट झाल्यानंतर पंजाबची स्थिती 8.1 षटकात 3 बाद 60 अशी होती. नंतर निकोलस पूरन व ग्लेन मॅक्सवेलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 41 धावांची भागीदारी केली. मात्र धावगती वाढवण्याच्या नादात निकोलस पूरनने आपली विकेट गमावली. त्याला जेम्स पॅटिन्सनने विकेटकीपर डी.काॅककडे झेल देण्यास भाग पाडले. पूरनने 27 चेंडूत 44 धावा केल्या. पूरन आऊट झाल्यानंतर मॅक्सवेलही आऊट झाला. मॅक्सवेलने 18 चेंडूत 11 धावा केल्या. त्याला राहूल चहरने आऊट केले. कृष्णाप्पा गाैतमने शेवटी काही फटके खेळत पंजाबची धावसंख्या 143 वर नेली. गाैतमने 13 चेंडूत 22 धावा केल्या.

दरम्यान, मुंबईकडून राहूल चहरने 2, जसप्रित बुमराने 2, जेम्स पॅटिन्सने 2 तर कृणाल पांड्या व ट्रेंट बोल्टने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

“हाथरसमधली घटना पाशवी; महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का?”

“रोहित शर्माचे शानदार अर्धशतक; मुंबईचे पंजाबसमोर 192 धावांचे लक्ष्य”

ही केवळ त्या मुलीची हत्या नाही तर मानवतेची हत्या आहे- अण्णा हजारे

नटवीसाठी आकांडतांडव करणाऱ्यांनी आता पीडित मुलीच्या न्यायाची लढाई लढावी- संजय राऊत