Home महाराष्ट्र ही केवळ त्या मुलीची हत्या नाही तर मानवतेची हत्या आहे- अण्णा हजारे

ही केवळ त्या मुलीची हत्या नाही तर मानवतेची हत्या आहे- अण्णा हजारे

अहमदनगर : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 19 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. दरम्यान, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्या पीडित मुलीचा मृत्यू झाला होता. यावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये काही नराधमांनी एखा मुलीसोबत दुष्यकृत्य केले आहे. हा मानवतेवरील कलंक आहे. ही केवळ त्या मुलीची हत्या नाही तर मानवतेची हत्या आहे. भारताची संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. अशा देशात लाजेने मान खाली घालावी लागणारे दुष्कृत्य होणे हे योग्य नाही. आणखी एक चिंताजनक गोष्ट म्हणजे ज्यांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळायची, ते लोक यात कमी पडत आहेत., असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ही गोष्ट देशासाठी चिंताजनक आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून अशा नराधमांना फाशी देणे आवश्यक आहे, असंही अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

नटवीसाठी आकांडतांडव करणाऱ्यांनी आता पीडित मुलीच्या न्यायाची लढाई लढावी- संजय राऊत

“उत्तर प्रदेशमध्ये जे घडलं ते महाराष्ट्रात सहन करणार नाही”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घराच्या बाहेर पडावं अन्यथा…; मराठा आंदोलकांचा इशारा

हा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा- छत्रपती संभाजीराजे