परप्रांतीयाच्या जाण्याने रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध- शिवेंद्रराजे भोसले

0
246

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीय कामगारांच्या जाण्याने रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. तरी, स्थानिक लोकांनी या संधीचं सोनं करून विविध कंपन्यांमध्ये, ऑफिसमध्ये आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळवावी आणि बेरोजगारीला आळा घालावा, असं आवाहन भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं आहे.

अनेक स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध नाहीत. नोकरी मिळत नाही. या स्थानिक तरुणांना रोजगारासाठी मुंबई, पुणे यांवर अवलंबून राहावे लागते, असे आपण ऐकत असतो, पण आजची परिस्थिती वेगळी आहे, असं शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

सातारा एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये टर्नर, फिटर, हेल्पर, मशिन ऑपरेटर, गवंडी, सुतार अशा अनेक पदांच्या असंख्य जागा रिक्त आहेत. त्यामुळे साताऱ्यातूनही हजारो परप्रांतीय त्यांच्या राज्यात परतले आहेत. यामुळे चालून आलेल्या संधीचा स्थानिक भूमिपुत्रांनी लाभ घ्यावा, असं शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं आहे. दरम्यान, कंपन्यांनाही कामगारांची गरज आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या या संधीचा फायदा घ्यावा, असं आवाहन शिवेंद्रराजेंनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

‘या’ मराठी अभिनेत्रीने केला पतीसोबतचा नको त्या अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर शेअर

तुझ्या या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार; प्रवीण तरडेंचा शेतकऱ्याला शब्द

निलेश राणे-रोहित पवार यांच्या वादावरुन जयंत पाटलांचा रोहित पवारांना सल्ला; म्हणाले…

खासदार धैर्यशील माने यांनी दिलं होम क्वारंटाईनसाठी स्वतःचं घर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here