Home महाराष्ट्र “आधी नाही म्हणाले, रागावले, चिडले, नंतर राज ठाकरेंनी जी कृती केली, त्याने...

“आधी नाही म्हणाले, रागावले, चिडले, नंतर राज ठाकरेंनी जी कृती केली, त्याने सर्वांची मने जिंकली”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल दीपोस्तव कार्यक्रमात एका तरुणाला हटकलं. हा तरुण राज ठाकरेंचा चाहता होता. सेल्फी काढण्यासाठी तो राज ठाकरे यांच्याकडे हट्ट करत होता. पण राज ठाकरे या तरुणावर आधी चिडले, त्याला नाही म्हणाले आणि नंतर रागावले सुद्धा. मात्र अखेर राज ठाकरे यांनी दीपोत्सव कार्यक्रम संपल्यानंतर घरी जाण्याआधी या तरुणाला मनसे कार्यकर्त्यांना शोधायला लावलं. त्याला बोलावून घेतलं आणि या तरुणाची सोबत सेल्फी काढण्याची इच्छाही पूर्ण केली. राज ठाकरेंनी केलेली ही कृती सगळ्यांचंच लक्ष वेधणारी ठरली.

मनसेच्या दीपोत्सवानिमित्त सायनमधील एक तरुण शिवाजी पार्क इथं आला होता. राज ठाकरेंचा चाहता असल्याने त्यांच्यासोबत फोटो काढण्याची त्याची इच्छा होती. दीपोत्सव कार्यक्रम संपल्यानंतर राज यांनी त्या तरूणाला बोलावलं आणि त्याच्यासोबत सेल्फी काढली. राज यांच्या या कृत्याने, त्यांनी सर्वांची मने जिंकली. यानंतर या तरूणाने टी.व्ही. 9 मराठीशी संवाद साधला.

हे ही वाचा : सांगलीत भाजपाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटल्यामुळे…

मी साहेबांच्या आजूबाजूलाच होतो. ते म्हणाले की, मला त्रास नको देऊ. नंतर राज ठाकरे शिवतीर्थ घरी जात होते. तेंव्हा त्यांनी परत मला बोलावून घेतलं. तो दाढीवाला मुलगा कुठेय, असं म्हणून त्यांनी मला बोलावलं आणि माझ्यासोबत फोटो काढला. मला त्याचा खूप आनंद झाला., असं त्या तरूणाने टी.व्ही. 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

सांगलीत भाजपाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटल्यामुळे…

शरद पवारांच्या गुगलीवर कोण क्लीनबोल्ड होणार?, ठाकरे की शिंदे?; रामदास आठवलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

“राष्ट्रवादीच्या ताकदीत वाढ; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”