Home महाराष्ट्र शरद पवारांच्या गुगलीवर कोण क्लीनबोल्ड होणार?, ठाकरे की शिंदे?; रामदास आठवलेंनी दिलं...

शरद पवारांच्या गुगलीवर कोण क्लीनबोल्ड होणार?, ठाकरे की शिंदे?; रामदास आठवलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काल मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक पार पडली. यामध्ये अनेक राजकीय पक्षांनी मतदान केले आहे.

तीनशेहून अधिक जणांनी यामध्ये मतदान केले आहे. त्यामध्ये माजी कसोटीवीर संदीप पाटील यांचा एक पॅनल आहे तर दूसरा पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते आशीष शेलार यांचा एक पॅनल आहे.

पवार आणि शेलार यांच्या पॅनलचे अमोल काळे आणि भारताचा माजी कसोटीवीर संदिप पाटील यांच्यामध्ये ही सरळ लढत पार पडली. या निवडणूकीत पवार-शेलार यांच्या पॅनेलचा विजय झाला. तर संदीप पाटील यांना पराभवाला सामोरे जावं लागले. यानंतर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीच्या ताकदीत वाढ; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रामदास आठवले यांनी मतदान करत शरद पवारांचे कौतुक करत ठाकरेंना टोला लगावला. शरद पवार हे जूने खेळाडू असून त्यांच्या गुगलीत उद्धव ठाकरे यांचा क्लीनबोल्ड होईल, असं आठवले म्हणाले.

शरद पवार हे कधी गुगली टाकतील आणि कुणाला आउट करतील हे सांगता येत नाही पण आत्ताच्या गुगलीत त्यांनी उद्धव ठाकरे यांना आउट केले आहेत., असं रामदास आठवलेंनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“उद्धव ठाकरेंचा मोठा डाव; एकनाथ शिंदेंच्या कट्टर विरोधकासह अनेक नेत्यांनी केली शिवसेनेत घरवापसी”

राज ठाकरेंचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

“राणेंची मोठी खेळी; कोकणातील पदाधिकाऱ्यांसह, अनेक शिवसैनिकांनी केला भाजपमध्ये प्रवेश”