Home महाराष्ट्र एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे आले एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चेला...

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे आले एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  मनसेच्या पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोटो झळकलाय. मनसेकडून दादरच्या शिवाजी पार्कात आयोजित केला जाणारा दिपोत्सवासाठी हा पोस्टर लावण्यात आला आहे. त्यामुळे  मनसे भाजप आणि शिंदेगटासोबत जाणार का?; अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

हे ही वाचा : शरद पवारांच्या गुगलीवर कोण क्लीनबोल्ड होणार?, ठाकरे की शिंदे?; रामदास आठवलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

मनसेनं शिंदे आणि फडणवीसांच्या स्वागताचं हे बॅनर शिवसेना भवनाच्या समोर लावलं आहे. सत्ताबदलानंतर राज ठाकरेंच्या कधी शिंदे गटासोबत तर कधी भाजप नेत्यांसोबत अनेक बैठका झाल्या. आता तिन्ही नेते एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी जर शिंदे आणि भाजपला साथ दिली,तर काही प्रमाणात मराठी मतं विभागली जाऊ शकतात आणि तो तोटा उद्धव ठाकरेंना होऊ शकतो.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“राष्ट्रवादीच्या ताकदीत वाढ; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

“उद्धव ठाकरेंचा मोठा डाव; एकनाथ शिंदेंच्या कट्टर विरोधकासह अनेक नेत्यांनी केली शिवसेनेत घरवापसी”

राज ठाकरेंचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश