Home महाराष्ट्र आधी नितेश राणेंचं म्याव म्याव, मग मलिकांचा ‘कोंबडा’ आणि आता पुन्हा पलटवार

आधी नितेश राणेंचं म्याव म्याव, मग मलिकांचा ‘कोंबडा’ आणि आता पुन्हा पलटवार

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई: राज्याचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात राजकारण चांगलचं तापलं आहे. अशातच भाजप नेते नितेश राणे यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा : वीरप्पन गॅंग पुन्हा सक्रिय; ओमिक्रॉनवरुन मनसेचा ठाकरे सरकारला टोला

आदित्य ठाकरे विधानसभेत येत असताना पायरीवर आंदोलन करत असलेल्या नितेश राणे यांनी म्याव म्याव करून डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एक फोटो ट्वीट केला होता. मलिक यांनी कोंबडीचा फोटो ट्वीट करत नितेश राणेंवर निशाणा साधला. या फोटोकडे निट पाहिलं तर शरीर कोंबडीचं आणि तोंड मांजरीचं असल्याचं पाहायला मिळत आहे. हा फोटो ट्वीट करताना मलिक यांनी पैहचान कौन? असा खोचक सवालही केला होता.

दरम्यान, त्याला उत्तर म्हणून नितेश राणेंनीही डुकराचा एक फोटो ट्विट केला होता. “ही प्रजाती फक्त भंगारात आढळते, ओळखा पाहू कोण?”, अशा ओळी नितेश राणे यांनी ट्विट केलेल्या फोटोसोबत लिहिल्या होत्या.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली मनसे आमदार राजू पाटील यांची भेट; भाजप-मनसे युतीवरून चर्चांना उधाण”

भाजपामध्ये राजकीय भूकंप; ‘या’ दोन नेत्यांसह, 4 आमदारांनी पक्ष सोडला

भाजपचं ‘संबंधित पात्र’ बरळलं, त्यांचा शिवद्रोह उघडा पडला; रूपाली पाटील ठोंबरेंचा हल्लाबोल