Home कोल्हापूर आधी पद द्या, मगच प्रवेश करतो; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंना...

आधी पद द्या, मगच प्रवेश करतो; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंना प्रस्ताव

816

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आमदारांनतर शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात दाखल झाले आहे, अशातच आता शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजप आणि शिंदे गटातील प्रवेशाकडे कल वाढल्याचं पहायला मिळतंय.

अशातच आता राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून शिंदे गटात सामील होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी एक अट ठेवली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी हा निर्णय घेतला असून, ‘आधी पद द्या, मग शिंदे गटात प्रवेश’ करतो, असा प्रस्तावच पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला आहे.

हे ही वाचा : रंगभूमीवरील ‘नटसम्राट’ हरपला ; जेष्ठ्य अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन

दरम्यान, मागील 5-6 वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक आश्वासने दिली; पण ती पूर्ण केली नाही. त्यामुळे ते नाराज होते. यामुळे ते आता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती कळत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पाटील यांची भेट घडवून आणली होती. त्यानंतरच त्यांच्या शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चा रंगल्या.

महत्त्वाच्या घडामोडी –

हिला आवर घाला नाहीतर…; गाैतमी पाटीलच्या ‘त्या’ डान्सवर मनसे आक्रमक

 उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र बंदच्या इशाऱ्यानंतर, खासदार संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण

“राष्ट्रवादीला मोठा धक्का; शरद पवारांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने सोडली, पक्षाची साथ”