Home महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र बंदच्या इशाऱ्यानंतर, खासदार संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट,...

उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र बंदच्या इशाऱ्यानंतर, खासदार संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंनी काल महाराष्ट्र बंद चा इशारा दिला होता. त्यानंतर आज राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यानंतर राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला.

काल उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी म्हणून सांगितलं. आपण सर्व महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी उभे आहोत. ही आज राज्याची आणि काळाची गरज आहे. सातत्यानं महाराष्ट्राचा अपमान होत आहे., असं राऊत म्हणाले.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीला मोठा धक्का; शरद पवारांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने सोडली, पक्षाची साथ”

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमेवरील गावांवरून हल्ला केला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराजांवरील अपमानाचा हल्ला आहे. याविरोधात एकजूट दाखवून पाणी दाखवावं. एकत्र यावं, ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. तसेच या विषयावर शरद पवार यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व एक आहोत, असंही राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

…तर महाराष्ट्र बंद पाडू; उद्धव ठाकरेंचा इशारा

विक्रम गोखलेंच्या निधनाची बातमी चुकीची; प्रकृतीबाबत पत्नीने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

पंजाब हादरलं! आधी कारमध्ये बोलावून घेतलं, त्यानंतर 4 मुलींनी त्याला दारू पाजली, आणि त्यानंतर चौघींनीही त्याच्यावर…