Home महाराष्ट्र …तर महाराष्ट्र बंद पाडू; उद्धव ठाकरेंचा इशारा

…तर महाराष्ट्र बंद पाडू; उद्धव ठाकरेंचा इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी परवा दिवशी औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलताना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. यावर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोश्यारींकडून मराठी अस्मितेचा अपमान, त्यांना राज्यपाल म्हणणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते मातोश्री येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे ही वाचा : विक्रम गोखलेंच्या निधनाची बातमी चुकीची; प्रकृतीबाबत पत्नीने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

वृद्धाश्रमात जागा नाही, अशा लोकांना राज्यपालपदी नेमलं जातंय, अशी टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. तसेच सर्व पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवा, कोश्यारी नावाचं पार्सलला परत पाठवा, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.

दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून कसलीही अपेक्षा नाही, पण महाराष्ट्रातील नेत्यांचा स्वाभिमान कुठे गेलाय?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.  तसेच एकत्र येऊन महाराष्ट्रद्रोह्यांना धडा शिकवू, वेळ आली तर महाराष्ट्र बंद पाडू, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

पंजाब हादरलं! आधी कारमध्ये बोलावून घेतलं, त्यानंतर 4 मुलींनी त्याला दारू पाजली, आणि त्यानंतर चौघींनीही त्याच्यावर…

राज्यपालांचा विषय, मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात संपविला, म्हणाले, महाराज आमचं दैवत, त्यांची तुलना…

भर सभेत राज ठाकरेंचा उल्लेख करत, सुषमा अंधारेंचा पोलिसांवर निशाणा, म्हणाल्या…