Home महाराष्ट्र “अखेर जत तालुक्याला न्याय मिळणार?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली ‘ही’ मोठा घोषणा”

“अखेर जत तालुक्याला न्याय मिळणार?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली ‘ही’ मोठा घोषणा”

269

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर दावा केला होता. तसेच त्यांनी अक्कलकोट आणि सोलापूरही कर्नाटकचाच भाग असल्याचं म्हटलं होतं. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं.

अशातच जत तालुक्यातील 40 गावांना कर्नाटक सरकारने पाणी दिल्याने या 40 गावांनी कर्नाटकात विलीन होण्याचा निर्णय घेतला. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत जत तालुक्यातील पाण्याच्या प्रश्नावर मार्ग काढला आहे.

जतमधील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तब्बल 2 हजार कोटींचं टेंडर काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे.

हे ही वाचा : महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा येणार?; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जत तालुक्यातील काही लोक भेटण्यासाठी आले होते. मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील लोकांच्या समस्य ऐकून घेत पुढच्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये आम्ही 2 हजार कोटींचे टेंडर काढणार असल्याचं आश्वासन यावेळी दिलं.

दरम्यान, म्हैसाळ योजनेची व्याप्ती वाढवण्याचं काम करतोय. जतमधील जे 40-50 गावे आहेत त्यांना पाणी मिळायला हवं. या विषयावर बाकीचे लोकं राजकारण करत असतील तर त्याला करु द्या. त्यांच्या राजकीय आरोपांना उत्तर देणार नाही. मी त्यांना कामातून उत्तर देईन एवढंच मी सांगतोय, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीने जातीच्या राजकारणासाठी शिवरायांचं नाव वापरलं; राज ठाकरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

“निवडणूक गुजरातची असो की, महाराष्ट्राची, तुम्हांला गरज बाळासाहेब ठाकरेंचीच”

आपल्याकडील इतिहास काय, मराठ्यांनी किंवा ब्राम्हणांनी…; राज ठाकरेंचं मोठं विधान