Home महाराष्ट्र आपल्याकडील इतिहास काय, मराठ्यांनी किंवा ब्राम्हणांनी…; राज ठाकरेंचं मोठं विधान

आपल्याकडील इतिहास काय, मराठ्यांनी किंवा ब्राम्हणांनी…; राज ठाकरेंचं मोठं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : हर हर महादेव तसेच वेडात मराठे वीर दाैडले सात या सिनेमावरून आता राजकीय वाद पेटला आहे. या चित्रपटामध्ये चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेड, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. यावरून खासदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे भोसले यांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. अशातच या सर्व प्रकरणावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्याकडील इतिहास हा काय मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी लिहिलेला नाही. मोघल, पोर्तुगीज,  ब्रिटिशांकडून अनेक गोष्टी आपल्यापर्यंत पोहचल्या आहेत. आणि महाराजांच्या काळातील एक ग्रंथ असलेल्या शिवभारत ग्रंथात ज्या काही गोष्टी सापडतात त्या आपल्यासमोर आहेत. या व्यतिरिक्त आपल्याकडे काही दाखले, पत्रच नाहीत, असं मोठं विधान राज ठाकरेंनी यावेळी केलं.

हे ही वाचा : मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपाताचं राजकारण सुरु झालं. शरद पवार हे कधीही भाषणात शिवाजी महाराजांचं नावं घेत नाहीत. ते फक्त शाहू, फुले आंबेडकर यांची नावं घेतात. कारण शिवाजी महाराजांचं नावं घेतलं की, मुस्लिम मतं जातात. यानंतर वेगवेगळ्या टोळ्या उभ्या करायच्या आणि मग त्यांच्याकडून शिवाजी महाराजांचं राजकारण सुरु ठेवायचं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रात हे विष कालवलं गेलं, असा आरोप राज ठाकरेंनी यावेळी केला.

दरम्यान, राज ठाकरे हे कोकण सध्या दाैऱ्यावर असून त्यांनी कुडाळ येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

महत्त्वाच्या घडामोडी –

“अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार ठरला?; ‘या’ दिवशी भाजप-शिंदे गटातील ‘इतक्या’ आमदारांना मिळणार मंत्रीपद”

छत्रपती शिवरायांप्रमाणे, एकनाथ शिंदेंनाही डांबून ठेवलं होतं; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं वादग्रस्त विधान

नक्कल करणाऱ्या राज ठाकरेंना, आता उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…