Home महाराष्ट्र मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले…

मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : वांद्रे येथील लहुजी साळवे यांच्या जयंती महोत्सवात शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं.

आपल्याला एक कर्तृत्ववान मुख्यमंत्री खुर्चीवर बसवायचा आहे. मग तो पुरुष असो किंवा स्त्री, असं विधान उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. ठाकरेंच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा : “अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार ठरला?; ‘या’ दिवशी भाजप-शिंदे गटातील ‘इतक्या’ आमदारांना मिळणार मंत्रीपद”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगळी वाट दाखविली. शिवशक्ती, भीमशक्ती आणि आता लहू शक्ती एकत्र येतेय. मला शिवाजी पार्कवर झाला तसा मेळावा लवकर घ्यायचा आहे., असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच या तिन्ही शक्तींचा कर्तबगार महिला किंवा पुरुष मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा आहे. हे स्वप्न, स्वप्न न ठेवता सत्यात उतरवायचं असेल तर तुम्हाला सोबत घेऊन ही विचारांची मशाल वाड्या, वस्त्यात घेऊन जावं लागेल., असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.

दरम्यान, यानंतर राज्यात जर महिला मुख्यमंत्री झाल्या तर कोण? यावर चर्चा सुरू झाली आहे.
ठाकरेंच्या या विधानामुळे पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? ती शिवसेनेचीच असेल का?की दुसऱ्या पक्षातील?; अशा अनेक चर्चांनी जोर धरला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

छत्रपती शिवरायांप्रमाणे, एकनाथ शिंदेंनाही डांबून ठेवलं होतं; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं वादग्रस्त विधान

नक्कल करणाऱ्या राज ठाकरेंना, आता उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

“ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के; ‘या’ मोठ्या नेत्यानं ठाकरेंची साथ सोडत केला शिंदे गटात प्रवेश”