Home महाराष्ट्र छत्रपती शिवरायांप्रमाणे, एकनाथ शिंदेंनाही डांबून ठेवलं होतं; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं वादग्रस्त...

छत्रपती शिवरायांप्रमाणे, एकनाथ शिंदेंनाही डांबून ठेवलं होतं; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं वादग्रस्त विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आज प्रतापगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला. यावेळी शिंदे गटासह भाजपचे अनेक नेते या सोहळ्यास उपस्थितीत होते. अशावेळी भाजपच्या एका नेत्याने यावेळी बोलताना वादग्रस्त विधान केलं आहे.

भाजप नेते व केंद्रीय पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील एका प्रसंगाची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे.

हे ही वाचा : नक्कल करणाऱ्या राज ठाकरेंना, आता उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवले होते; परंतु स्वराज्यासाठी ते बाहेर पडले. तसेच एकनाथ शिंदेंनादेखील कोणी तरी डांबून ठेवले होते, आणि ते महाराष्ट्रासाठी बाहेर पडले, असं विधान मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी बोलताना केलं.

दरम्यान, मंगलप्रभात लोढा यांच्या या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के; ‘या’ मोठ्या नेत्यानं ठाकरेंची साथ सोडत केला शिंदे गटात प्रवेश”

“जितेंद्र आव्हाडांना विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकविण्यात, मनसेच्या मोठ्या नेत्याचा हात?”

“ताराराणी चाैकात मनसेचं जंगी स्वागत; राज ठाकरे यांना पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची प्रचंड गर्दी”