Home देश पटापट पेट्रोल टँक भरून घ्या, कारण मोदी सरकारची इलेक्शन ऑफर संपणार; राहुल...

पटापट पेट्रोल टँक भरून घ्या, कारण मोदी सरकारची इलेक्शन ऑफर संपणार; राहुल गांधींचा टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

पटापट पेट्रोल टँक भरून घ्या कारण इलेक्शन ऑफर लवकरच संपणार आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. पेट्रोल डिझेलच्या किमतीवरुन राहुल गांधी यांनी ट्विट करत नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला.

हे ही वाचा : “लढायचं ते जिंकण्यासाठी; पुण्यात मनसेचा नवा नारा, पोस्टरवर पहिल्यांदाच अमित ठाकरे”

दरम्यान, पाच राज्यातील निवडणुकांसाठीचा प्रचार संपला आहे. त्यामुळं राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती निवडणुकांमुळं वाढवण्यापासून थांबवल्याचा आरोप केला. मात्र, निवडणुका झाल्यानंतर लगेचच किमती वाढतील, अशा प्रकारचे आरोप करण्यात येत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आगामी काळात भाजपमधील 17 नगरसेवक राष्ट्रवादीत येणार; ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

“युक्रेनमधील युद्ध तात्पुरतं थांबलं; रशियानं केली ‘ही’ मोठी घोषणा”

राणे साहेबांनाही अटक झाली होती, त्यांचा राजीनामा घेतला का?; शरद पवारांचा भाजपला सवाल