Home महाराष्ट्र आगामी काळात भाजपमधील 17 नगरसेवक राष्ट्रवादीत येणार; ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

आगामी काळात भाजपमधील 17 नगरसेवक राष्ट्रवादीत येणार; ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी काळात भाजपमधील 17 नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये येणार आहेत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते संजय शेटे यांनी केलं आहे. आज मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात लातूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लातूरचे माजी नगराध्यक्ष व्यंकट बेंद्रे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी संजय शेटे बोलत होते.

जिल्ह्यात आधी भाजपचे शून्य नगरसेवक होते. पण तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले, त्यांनी बरंच काही खोटं सांगितलं. शिवाय आपल्या नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना पक्षात ओढलं. त्यामुळे आज भाजपचे 33 नगरसेवक झाले आहेत, असं संजय शेटे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : “युक्रेनमधील युद्ध तात्पुरतं थांबलं; रशियानं केली ‘ही’ मोठी घोषणा”

दरम्यान,  आता ते सगळे परत येण्याच्या वाटेवर आहेत. आगामी काळात भाजपमधील 17 नगरसेवक आणि काँग्रेससह इतर 8 नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये येणार आहेत. या सर्वांच्या पक्षप्रवेशासाठी जयंत पाटील यांनी आपण लातूरमध्ये येणार असल्याचा शब्द दिला आहे, असंही संजय शेटे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राणे साहेबांनाही अटक झाली होती, त्यांचा राजीनामा घेतला का?; शरद पवारांचा भाजपला सवाल

“राज्यपाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करत आहेत”

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट; कोणत्या विषयांवर चर्चा?