Home महाराष्ट्र नाना पटोलेंच्या विरोधात गावोगाव तक्रारी दाखल करा, चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना आदेश

नाना पटोलेंच्या विरोधात गावोगाव तक्रारी दाखल करा, चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना आदेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी चूक झाली आणि राष्ट्रीय राजकारणात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. चंद्रकांत पाटील मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.

हे ही वाचा : अखेर ठरलं! ‘या’ तारखेपासून मिळणार बूस्टर डोस; मुंबई महानगरपालिकेकडून नवी नियमावली जारी”

पाकिस्तानच्या सीमेजवळ घडलेल्या या प्रकारामागे पंतप्रधानांच्या हत्येचे कारस्थान असल्याचा संशय व्यक्त होत आहे. देशाच्या सुरक्षितेविषयी अत्यंत गंभीर विषयावर आता सर्वोच्च पातळीवर चौकशी सुरू आहे. अशा स्थितीत नाना पटोले यांनी ही घटना नौटंकी असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केली तसेच त्यांनी या घटनेमागे देशाच्या गृहमंत्र्यांचा हात असल्याचा संशय जाहीरपणे व्यक्त केला. हा तपासावर प्रभाव टाकण्याचा व तपासाची दिशा भरकवटण्याचा प्रयत्न आहे. याचा आपण निषेध करतो आणि पटोले यांच्यावर कारवाईची मागणी करतो. पंतप्रधानांच्या हत्येच्या प्रयत्नाबद्दल त्यांच्याकडे काही माहिती आहे का याचा तपास करावा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, पटोले यांनी देशाच्या सुरक्षतेच्या मुद्द्यावर जनतेची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्याची सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

 मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

राज्यात रावणासारखं दहा तोंडाचं सरकार; निर्बंधांवरून भाजपची टिका

“धनंजय मुंडेंचा आमच्या पक्षाला पाठिंबा”; करूणा मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य