फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, आता उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

0
395

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात बोलताना एक मोठा गाैफ्यस्फोट केला आहे. 2019 साली शिवसेनेनं आमच्याबरोबर गद्दारी केली. माझ्या, भाजपच्या पाठीत उद्धव ठाकरेंनी खंजीर खुपसला, त्याचा बदला आम्ही घेतला, असं फडणवीस म्हणाले होते. यावर आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘आता परत, जाऊ द्या हो, आता तर लोकांसमोर हे सगळं घडलं आहे. मी मागे एकदा बोललो होतो. हा दृष्टीहीन धृतराष्ट्र नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे कुणी काय बोलतं, हे अवघा महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय’,  असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी यावेळी माध्यमांना बोलताना दिलं.

हे ही वाचा : गुलाबराव पाटलांकडून सुषमा अंधारेंचा नटी असा उल्लेख; आता रूपाली पाटलांचं, गुलाबरावांना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाल्या…

दरम्यान, इंडिया टुडेच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी, 2019 साली शिवसेनेनं आमच्याबरोबर गद्दारी केली. माझ्या, भाजपच्या पाठीत उद्धव ठाकरेंनी खंजीर खुपसला होता. तेंव्हापासून आम्ही वाट पाहत होतो., असं फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या व्यवहारामुळे एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच आम्हाला याची माहिती मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंबरोबर परत जावा, असं थोडीच त्यांना सांगणार. तेंव्हा, एकनाथ शिंदेंना म्हणालो, बरं झालं आपण बाहेर पडला. आम्ही तुमच्याबरोबर असू., असं मी त्यांना सांगितलं. तसेच माझ्याबरोबर जी गद्दारी झाली, त्याचा आम्ही बदला घेतला, असंही फडणवीस म्हणाले होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

ऋतुजा लटके यांच्या विजयावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मशाल भडकली आणि…

एकनाथ शिंदेंचा मनसेला मोठा धक्का; साडेतीन हजार पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

विजयानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here