Home पुणे गुलाबराव पाटलांकडून सुषमा अंधारेंचा नटी असा उल्लेख; आता रूपाली पाटलांचं, गुलाबरावांना जोरदार...

गुलाबराव पाटलांकडून सुषमा अंधारेंचा नटी असा उल्लेख; आता रूपाली पाटलांचं, गुलाबरावांना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाल्या…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेतून शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल सूरू केला आहे. त्यामुळे शिंदे गटात खळबळ उडाली आहे. अशातच शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारेंवर टीका करताना त्यांचा नटी असा उल्लेख केला होता. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुळात महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचविणारे ईडी सरकारमधले लोक आहेत. म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप. गुलाबराव पाटलांचं हे पहिलं वक्तव्य नाहीये परंतु आपण एक जबाबदार मंत्री आहात, एका महत्वाच्या पदावर बसलेले आहात आणि विरोधकांवर आपण ज्या पद्धतीने भाजपच्या सोबत जाऊन हिटलरशाही, दबावशाही, खोटे गुन्हे दाखल करतायत, पुरूषांना तर यांनी सोडलेलं नाहीच, आता महिलांना सुद्धा टार्गैट करण्याचा त्यांचा हा प्रत्येक वेळीचा डाव आहे हे आम्ही अनुभवतोय., असं रूपाली पाटील म्हणाल्या.

हे ही वाचा : ऋतुजा लटके यांच्या विजयावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मशाल भडकली आणि…

सुषमा अंधारे कोण आहेत, त्या शिवसेना पक्षाच्या नेत्या आहेत, आणि ते त्यांच्या पक्षाची सभा घेतायत. त्यांच्या भागात जाऊन सभा घेतायत. तुम्हांला त्यांचे विचार पटत नसतील , अवडत नसतील, परंतु सभेला 500-1000 पोलिस पाठवणं म्हणजेच सत्तेचा गैरवापर करण्यासारखं आहे आता राहिला प्रश्न सुषमा ताई नटी आहेत की नाहीत. तर गुलाबराव पाटलांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर नावातच गु आहे, त्यामुळे आम्हाला अपेक्षाच नाही महिलांना त्यांच्याकडनं ते चांगले बोलतील म्हणून, आणि आपण मंत्रीपदावर असताना, सातत्याने, महाराष्ट्रातील समाजातील महिलांवर, विरोधकातील ज्या महिला आहेत त्यांच्यावर जर अशी वक्तव्ये करत असाल, तर तुम्ही इतर समाजाला असा मैसेज देताय का की, महिलांना बोला, शिवीगाळ करा, वाट्टेल तसं त्यांचं शोषण करा, हाच अर्थ निघतो. आणि सुषमा ताई जर नटी असतील, तर गुलाबरावच्या घरात सुद्धा नट्या आहेत ना , त्या उतरव्यात त्यांनी मैदानात. कारण दुसऱ्या ज्या महिलांना बोलताना उचलली जीभ लावली टाळ्याला अशी जी पद्धत आहे, ती बंद झाली पाहिजे. माझी, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, हे तुमचे जे आमदार आहेत ना, त्यांना आवरा हे महाराष्ट्रातल्या माता भगिनींचा लक्तरे काढतायत , बेताल वक्तव्ये करतायत, असं असतं का सरकार?, असा सवाल रूपाली पाटील यांनी यावेळी केला.

लाजा वाटल्या पाहिजेत यांना. सऱळ सांगाताय की, सुषमा अंधारे नटी आहेत, मग तुझ्या घरातल्या ज्या नट्या आहेत, त्यांना सुद्धा बाहेर काढ, नटी हा शब्द वाईट नसेल तर नक्कीच गुलाबरावना लागणार नाही. जाणून बुजून खच्चीकरण करणं शिवसेनेच्या ज्या नेत्या आहेत, किशोरी पेडणेकर त्यांच्यामागे  ससेमिरा लावणं कारण का त्या बोलतात, त्या अन्यायाच्या विरोधात बोलतात, जे चुकीचं घडलंय, त्याचा जाब सरकारला विचारतात , धारेवर धरतात म्हणून सातत्याने ईडी सरकार, प्रामुख्याने भाजप आणि भाजपसोबत मिळालेलं हे मुख्यमंत्र्यांचे जे हे आमदार आहेत, गद्दार आमदार, ही लाेकं जर महिलांना अशा प्रकारे त्रास देत असतील , तर सर्व पक्षाच्या महिला भाजप सोडून आम्ही रस्त्यावर उतरून या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, आमच्या माता भगिनींचा अपमान करणाऱ्याचा अधिकार तुम्हांला नाही, तिला खच्चीकरण करण्याचा अधिकार नाही, आणि तुमच्या माध्यमातून सांगते, सुषमा ताई , अजिबात घाबरू नका, आम्ही सगळ्या भगिनी, सहकारी जरी वेगळ्या पक्षात असलो, तरी तुमच्या सोबत आहेत. जे जे महिलांचे नामोहरण करण्याचा प्रयत्न करतायत , ते मातीत गेल्याचं पहायला दिसतंय. आणि यांची अवस्था हीच होणार, असं रूपाली पाटील म्हणाल्या.

महत्त्वाच्या  घडामोडी –

एकनाथ शिंदेंचा मनसेला मोठा धक्का; साडेतीन हजार पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

विजयानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

मी नाही खाणार आणि तुला पण नाय खाऊ देणार; नोटाला मिळालेल्या मतांवरून मनसे नेत्याचा भाजपवर निशाणा