मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी एक पत्रक जारी केलं असून पडळकरांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.ळण
संतापामध्ये मी कधीही फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग असं म्हणणार नाही. वस्तुस्थिती असली तरी तसे मी कधी बोलणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य अनिल गोटे यांनी केलं आहे.
देवेंद्र फडणवीसांनी माझ्याशी केलेली धोकेबाजी, विश्वासघात जगजाहीर आहे. एकही धनगर विधानसभेत घेऊ नये यासाठी केलेली कारस्थानं, डावपेच आणि प्रसंगी विरोधकांना बळ देण्याचे उद्योग मी जाणून आहे. माझ्या मतदारसंघात तर मुसलमान आला तरी चालेल पण अनिल गोटे येता कामा नये यासाठी पैशाचा महापूर आला होता, असं अनिल गोटे म्हणाले.
दरम्यान, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबातील कुणीही राजकारणात राहू नये, अशी हलकट, नीच आणि संकुचित बुद्धी फडणवीसांचीच असू शकते असा आरोपदेखील अनिल गोटे यांनी केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
‘भाजपाच्या आमदाराला हात जरी लावला तरी…’; निलेश राणेंचं राष्ट्रवादीला आव्हान
“औरंगाबाद महापालिकेत मनसेचा राडा; उपायुक्तांवर खुर्ची उगारली”
कोरोना झाल्याचं समजताच पंकजा ताईचा फोन आला आणि…; धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या भावना
…तो अति आत्मविश्वास नडला; कोरोनावर मात केल्यानंतर धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या भावना