Home नाशिक शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ मोठ्या नेत्याची नाशिकमध्ये येण्याआधीच हकालपट्टी

शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ मोठ्या नेत्याची नाशिकमध्ये येण्याआधीच हकालपट्टी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेविरोधात बंड केलं. त्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. या फूटीनंतर नाशिकचे माजी नगरसेवर प्रवीण तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

शिंदे गटात प्रवेश करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिदमे यांची म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. मात्र नाशिकला परतण्याआधीच तिदमे यांची म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली.

हे ही वाचा : प्रसिद्ध उद्योजक गाैतम अदानी यांनी मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट; तासभर खलबतं, चर्चांना उधाण

दरम्यान, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री बबन घोलप यांनी यासंदर्भात पत्रक काढलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवसेनेची गत शरद पवारांच्या पिंजऱ्यामधील मांजरासारखी झालीये; मनसेची टीका

बॉलिवूडवर शोककळा; प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड

सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंची तोफ कडाडणार; ‘या’ ठिकाणी घेणार आज मेळावा