2014 मध्येही शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा प्रस्ताव आला होता- पृथ्वीराज चव्हाण

0
247

मुंबई : 2014 मध्येही शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा प्रस्ताव आला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते एका ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

भाजपने 2014 साली अल्प मतांवर सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेकडून आघाडीचे सरकार स्थापन व्हावे यासाठी प्रस्ताव आला होता. यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने माझ्याशी संपर्क साधला. मात्र, मी तो प्रस्ताव फेटाळून लावला, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसला त्यावेळी कमी जागांवर यश आलं होतं. त्यामुळे आम्ही विरोधात बसणार हे निश्चित होते. राजकारणात जय-पराजय होत असतात”, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

दरम्यान, “2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला गेला. भाजपकडून राष्ट्रवादी-काँग्रेसच्या 40 आमदारांना धमकीचे आणि आमिषाचे फोन आले होते. असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

गेली सात वर्षे मी सर्व सहन केलं; धनंजय मुंडे झाले भावूक

“नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना”

‘तान्हाजी द अनसंय वॉरियर’ चित्रपटात दाखवलेला इतिहास चुकीचा- सैफ अली खान

रोहित आणि विराटच्या खेळीमुळे भारताचा 7 बळी राखून विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here